मुंबईच्या कोर्टातून इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी पळाला

September 20, 2013 5:36 PM0 commentsViews: 1245

mumbai coart20 सप्टेंबर : मुंबईच्या सेशन्स कोर्टातून इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी अफझल उस्मानी पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची खळबळजनक घटना घडलीय. आज सुरत बॉम्बस्फोट प्रकरणी अफला कोर्टात हजर करतेवेळी अफजल पोलिसांच्या तावडीतून पळालाय.

 

सुरत बॉम्बस्फोट प्रकरणात काही दिवसांपुर्वी मुंबई क्राईम ब्रांचने काही आरोपींनी अटक केली होती हे सर्व आरोपी इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित होते. यात अफजल हा मुख्य आरोपी आहे. सुरतमध्ये जे स्फोट झाले होते. त्यावेळी स्फोटकांनी भरलेल्या गाड्या मुंबईतून सुरतला नेण्यात आल्या होत्या. त्या गाड्या उस्मानीने चोरल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं. उस्मानी हा गाड्या चोर होता. त्यानंतर तो इंडियन मुजाहिद्दीन संघटनेत मिसळला होता.

 

या प्रकरणी उस्मानीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली होती. देशात कुठेही स्फोट घडवण्याअगोदर मुजाहिद्दीन एक धमकीचा ई-मेल पाठवत होती. त्यावेळी मुंबईतील चेंबूर भागातून उस्मानीने धमकीचे ई-मेल पाठवल्याचं तपासातून स्पष्ट झालं होतंय. याच प्रकरणी आज कोर्टात उस्मानीविरोधात आरोप निश्चित होणार होते. आज सर्व आरोपींनी सेशन्स कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी उस्मानी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. उस्मानीचा शोध घेण्यासाठी पोलीस दल कामाला लागले असून उस्मानी कुठं लपून बसलाय का? कोणत्या मार्गाने पळाला याचा शोध पोलीस घेत आहे.

close