‘आधार कार्ड’ची नोंदणी आता गॅस वितरकाकडे

September 20, 2013 2:07 PM0 commentsViews: 1333

2Image img_236662_aadharcard_240x180.jpg0 सप्टेंबर : ‘आधार कार्ड’ची नोंदणी आता तुमच्या गॅस वितरकाकडेच करून तिथेच आधार कार्डची प्रिंट आऊट काढता येणार आहे. त्यामुळे डायरेक्ट कॅश बेनिफीटचा लाभ मिळणं आता सुकर होणार आहे.

 

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव राजीव मित्तल यांनी राज्यातल्या जिल्हाधिकार्‍यांना तशा सुचना दिल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

 

त्यावेळी केंद्र सरकारच्या सर्व योजना जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना सर्व अधिकार्‍यांना देण्यात आल्या. तसंच या योजना परिणामकारकरितीने राबवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या बैठकीत अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेण्यात आला.

close