बाप्पा यांना माफ कसं करायचं?

September 20, 2013 9:37 PM0 commentsViews: 12904

20 सप्टेंबर : गणेश विसर्जनाच्या दिवशी लालबागचा राजाच्या मिरवणुकीत तरूणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. मिड डे या वृत्तपत्राच्या फोटोग्राफरनं पाहिलं की एकीकडं जल्लोष सुरू असताना मिरवणुकीत एका तरुणीला काही तरूणांनी घेरलंय. गर्दीचा फायदा उठवत हे तरूण तिला हातानं ओढायला लागले आणि अश्लिल चाळे करायला लागले. जवळच पूलावर असलेल्या फोटोग्राफरनं हा प्रकार आपल्या कॅमेर्‍यात कैद केला. विशेष म्हणजे विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये विनयभंगाचे प्रकार रोखता यावेत आणि महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी मुंबई पोलिसांनी स्पेशल स्क्वॉड तयार केलंय. मात्र विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये विनयभंगाचा प्रकार घडल्यानं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

close