साप नव्हे, ती तर घोरपड

September 20, 2013 9:58 PM0 commentsViews: 2047

20 सप्टेंबर : नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तर अंगाचा थरकाप उडतो पण घरात साप शिरला असं समजून घोरपड निघाल्यामुळे वावळोली गावातील एका कुटुंबीयाचा जीव भांड्यात पडला. रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील वावळोली इथं सर्पमित्रांनी एक घोरपड पकडली होती. घरात साप शिरल्याचा फोन आल्यानंतर दहा किलोमीटर अंतर पार करून सर्पमित्र रजनीश पवाळी वावळोली इथं पोहोचले.घराच्या माळ्यावर केवळ शेपटी दिसत होती. सर्पमित्रांनी त्याला बाहेर काढल्यानंतर तो साप नसून घोरपड असल्याचे लक्षात आले. नंतर ही घोरपड पकडून तिला कर्जत वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. नंतर हि घोरपड जंगलात सोडून देण्यात आली.

close