कल्याण पालिकेच्या महासभेत शिवसेना नगरसेवक भिडले

September 20, 2013 10:11 PM0 commentsViews: 1050

20 सप्टेंबर : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महासभेत शिवसेना नगरसेवकांमध्ये आज तुंबळ हाणामारी झाली. महासभेत पाणी प्रश्नावरून चर्चा सुरू होती. कल्याण पूर्वेतल्या मनसेच्या नगरसेविका सुनिता घरत या बोलत होत्या. त्यावेळी सभागृह नेते रवींद्र पाटील ही चर्चा गांभिर्यानं घेत नाहीत, असा आरोप शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांनी केला. त्यानंतर रवींद्र पाटील आणि शेट्टी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्याचं रुपांतर भरसभेत हाणामारीत झालं. दोघांनी एकमेकांना मारहाण केली. त्यामुळे महापौर कल्याणी पाटील यांनी दहा मिनिटं महासभा स्थगित केली.

close