शहिदांच्या नातेवाईकांना सीएनजी पंपाचं वितरण

February 1, 2009 8:08 AM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारी मुंबईमुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आलेल्या पोलीस अधिका-यांच्या नातेवाईकांना सीएनजी पंपाचं वितरण सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आलं. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पंपाचे कागदपत्र शहिदांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. यावेळी कामा हॉस्पिटलच्या अपग्रेडेशनसाठी ओनजीसीने 20 कोटी रुपयाचा निधी सोपवला. एकूण 18 शहिदांच्या परिवारांना ह्या सीएनजी पंपांचं वितरण करण्यात आलं.

close