मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी भाजप,बसपाच्या आमदारांना अटक

September 21, 2013 4:24 PM0 commentsViews: 349

sangiti som21 सप्टेंबर : मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी भाजपच्या दोन आणि बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय. बहुजन समाज पक्षाचे आमदार नूर सलीम राणांना आज अटक करण्यात आलीय.

 

तर भाजपचे आमदार संगीत सोम पोलिसांना शरण आले आहे. चिथावणीखोर व्हिडिओ अपलोड केल्याचा सोम यांच्यावर आरोप आहे. शुक्रवारी भाजपचे आमदार सुरेश राणांना यांना अटक करण्यात आली होती.

 

सुरेश राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. याच सगळ्या घडामोडीदरम्यान भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंहांनी त्यांचा मुझफ्फरनगरचा दौरा रद्द केलाय. दंगलीमागे उत्तर प्रदेश सरकारचाच हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी केलीय.

close