उस्मानीला शोधण्यासाठी 20 पथक तैनात

September 21, 2013 2:43 PM0 commentsViews: 339

afzal usmani21 सप्टेंबर : मुंबईतील सत्र न्यायालयातून पळालेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी अफझल उस्मानीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. उस्मानीच्या शोधासाठी पोलिसांच्या 20 टीम तयार करण्यात आल्यात.

 

त्यात महाराष्ट्र एटीएस, क्राईम ब्रांच आणि नवी मुंबई पोलिसांचा समावेश आहे. उस्मानी ज्या ठिकाणी लपला असेल अशा मुंबईतल्या जुन्या ठिकाणांची झाडाझडती सुरू आहे. उस्मानीचे फोटो सर्व पोलीस स्टेशन्समध्ये पाठवण्यात आलेत.

 

कोर्टात नेत असताना उस्मानी शुक्रवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. या प्रकरणाची नवी मुंबई पोलिसांकडून डीसीपी स्तरावर चौकशी सुरू आहे. तसंच दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

close