संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करा:हायकोर्ट

September 21, 2013 5:12 PM0 commentsViews: 794

Image img_234702_santoshmane44_240x180.jpg21 सप्टेंबर : पुण्यात बेदाकारपणे एस.टी बस चालवून 9 जणांना चिरडणार्‍या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करा असे निर्देश हायकोर्टाने पुणे कोर्टाला दिले आहेत. संतोष माने याने एसटी बसखाली 9 जणांना चिरडलं होतं. त्यावेळी माने हा मनोरूग्ण असल्याचा बचाव त्याच्या वकिलांनी केला होता.

 

पण हा दावा फेटाळत पुणे न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं आणि फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आज हायकोर्टाने निर्देश दिल्यामुळे या खटल्याची सुनावणी नव्याने होणार आहे.

 

पुण्यात 25 जानेवारी 2012 रोजी स्वारगेट एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन संतोष मानेनं पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे चालवली होती. यामध्ये 9 जणांचा बळी गेला होता तर 27 जण जखमी झाले होते. या प्रकरणी संतोष माने याला पुणे सेशन्स कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वध, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणे या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलं होतं.

close