पुणतांब्याच्या शेतक-यांची गांधीगिरी

February 1, 2009 8:32 AM0 commentsViews: 3

1 फेब्रुवारी पुणतांबाहरिष दिमोटेसततच्या भारनियमनाला कंटाळून, पुणतांब्याच्या शेतक-यांनी वेगळंच आंदोलन केलं आहे. सततच्या वीजेच्या लपंडावाला कंटाळल्याने त्यांनी स्वत:च्याच शेतातल्या उभ्या पिकावरून नांगर फिरवला. वीजकंपनीचा निषेध करण्यासाठी आतापर्यंत 18 एकर जमिनीवरचा ऊस, गहू आणि कांद्यावरून नांगर फिरवण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे शेतकरी विद्युत कंपनीकडे दाद मागत आहेत.पण त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. शेवटी त्यांनी गांधीगिरी पद्धतीनं अधिका-यांच्या रिकाम्या खुर्चीचा सत्कार केला. या सत्कार समारंभाला 300 शेतकरी सहभागी झाले. पण शेवटी सगळे उपाय थकल्यानंतर त्यांनी आपापल्या पिकावर नांगर फिरवला.

close