उस्मानी पळाला की पळवून लावला?-मुंडे

September 21, 2013 9:49 PM0 commentsViews: 1410

21 सप्टेंबर : पोलिसांच्या हातातून दहशतवादी अफझल उस्मानी पळाला की पळवून लावला, महाराष्ट्र सरकारचं षडयंत्र तर नाही ना असा सवाल भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात दोन पोलिसांना निलंबित केलं पण ज्यांच्या हातून हा उस्मानी पळाला त्याच पोलीस आयुक्तांची चौकशीसाठी निवड केलीय. आता हा आरोपी पळून गेला हे काय चौकशी करणार असंही मुंडे म्हणाले. इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी अफझल उस्मानी शुक्रवारी कोर्टात नेत असताना पोलिसांची सुरक्षा भेदून पळून गेला. या प्रकरणाची नवी मुंबई पोलिसांकडून डीसीपी स्तरावर चौकशी सुरू आहे. तसंच दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली

close