बोईंगप्रकल्पामुळे नागपूरच्या उद्योजकांना नव्या संधी

February 1, 2009 9:25 AM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारी नागपूरप्रशांत कोरटकर नागपूरमध्ये होणा-या मिहान प्रकल्पाचा महत्त्वाचा दुवा म्हणजे बोईंगचा एमआरओ प्रकल्प. अनेक महिन्यापासून बोंईगकडून काहीच सूचना न मिळाल्यानं ह्या प्रकल्पाचं पुढं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण उशीरानं का होईना बोइंर्गनं अखेर इथली गुंतवणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यामुळे मिहानला आता संजीवनी मिळाली आहे.नागपूर विमानतळाच्या बाजूची सर्व जमीन गेल्या अनेक महिन्यापासून बोईंगच्या एमआरओ प्रकल्पाची वाट पहाते होती. दरम्यान आता बोईंग या विमान कंपनीचे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर नागपुरात दाखल झाले आणि त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. आणि अखेर सर्वांनाच समाधान मिळालं.नागपूरच्या 4 हजार हेक्टरवर होऊ घातलेल्या मिहान प्रकल्पात बोईंगनं विमानांच्या दुरूस्ती प्रकल्पासाठी म्हणजेच एमआरओसाठी (मेंटेनन्स रिअरिंग ऍण्ड ओवर ऑईलिंगसाठी) 50 एकर जागी घेतली आहे. जगातील सर्वात प्रसिध्द कंपनी म्हणून बोंईगकडे सध्या पाहीलं जातं. सध्या बोईंगकडे 275 अब्ज डॉलर्सचे 3700 नवी विमानं तयार करण्याच्या ऑर्डर्स आहेत. मंदीनंतरही 5 वर्षापर्यत ह्या कंपनीची स्थिती चांगली राहिल असं चित्र आहे. आणि त्यामुळेच नागपूर प्रकल्पावर याचा फारसा परिणाम दिसला नाही.मिहानमध्ये एअर डेक्कन आपली कार्गाे सेवा सुरू करत आहे. त्यातच बोईंग एमआरओच्या कामला लवकरच सुरुवात करणार आहे. बोईंगच्या या निर्णयाच्या वेळीच ड्युक्सही पुढच्या आठवड्यात आपल्या एमआरओचं काम सुरू करत आहे. त्यामुळे उद्योजकांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे.महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेट कंपनी बोईंगच्या भरवशावरच नागपुरात 33 हजार कोटीची गुंतवणूक होण्याच्या गोष्टी करत होती. बोईंग आल्यानं उद्योजकांना नवा विश्‍वास तर मिळालाय पण या प्रकल्पामुळे आता इथल्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर नोक-याही मिळणार आहेत.

close