‘लंचबॉक्स’ला मागे टाकत ‘द गुड रोड’ ऑस्करच्या शर्यतीत

September 21, 2013 9:07 PM1 commentViews: 1571

the good road21 सप्टेंबर : चित्रपटासाठी सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून ‘द गुड रोड’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गुजराती सिनेमाची निवड करण्यात आली आहे. ज्ञान कोरिया दिग्दर्शित ‘द गुड रोड’ या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाने ‘लंचबॉक्स’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमांना टक्कर दिली आणि अखेर या शर्यतीत बाजी मारली.

 

यंदाच्या ऑस्कर वारीसाठी देशभरातून वेगवेगळे सिनेमे मागवण्यात आले होते. यात अलीकडेच रिलीज झालेला ‘लंच बॉक्स’ची शक्यता जास्त होती. तसंच याच शर्यतीत ‘भाग मिल्खा भाग’, ‘विश्वरूपम’ यांचाही समावेश होता. मात्र फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने ‘द गुड रोड’ला पसंती दिली.

 

समितीचे अध्यक्ष गौतम घोष यांनी याबाबत आज घोषणा केली. ‘द गुड रोड’ हा सिनेमा तीन व्यक्तींच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचं सर्वाधिक चित्रिकरण गुजरातमध्ये झालं. या सिनेमाला यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळालाय.

  • Akash Deshpande

    Yaa aivaji Madras Cafe jayla hava hota!

close