नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग

September 21, 2013 10:33 PM0 commentsViews: 489

अकोला मेडिकल कॉलेजमधल्या नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडालीय. वरच्या वर्गातील विद्यार्थिनीनी रॅगिंग केल्याची तक्रार राधिका कानकिरडे या विद्यार्थिनीनं केलीय. यात राधिकाचा हात मोडला असून कानाला दुखापत झालीय. गेल्या तीन वर्षांपासून रॅगिंग होत असल्याचा आरोप राधिकानं केलाय. याप्रकरणी सीटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्रिन्सिपल नलिनी देशमुख यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. पण नलिनी देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. राधिकाचीच चूक असल्याचा आरोप त्यांनी केला. राधिका स्वत:ला मारून घेते, यावेळी देखिल तिनं स्वत:ला त्रास करून घेतला. ती जमिनीवर पडल्यानंतर तिला मुलींनी उचललं. ती रॅगिंग कशी म्हणता येईल असा उलटा सवाल देशमुख यांनी विचारलाय.

close