माहीम खाडीजवळ आढळला तरुणीचा मृतदेह

September 23, 2013 2:30 PM0 commentsViews: 1962

mahim murder23 सप्टेंबर : मुंबईतील माहीम खाडीजवळ रविवारी रात्री एका तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यामुळे खळबळ उडालीय. पोलिसांना हे तुकडे एका बँगमध्ये सापडलेत. या तरुणीचं वय अंदाजे 17 ते 22 वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.

 

या प्रकरणी तपास करण्यासाठी वांद्रे पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलंय. शिवाय या तरुणीच्या शरीराच्या इतर अवयवांचाही शोध घेतला जातोय. या प्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

ही तरुणी कोण आहे, या तरुणीची हत्या करण्यात आली की आणखी काही कारण यामागे आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहे. या तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धारदार शस्त्राने तुकडे करण्यात आल्याची शक्यता आहे. रेल्लेमेशनच्या किनार्‍याजवळ दुर्गंध येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली त्यानंतर पोलिसांनी तिथं येऊन चौकशी केली असता एका पोत्यात तरुणीचे तुकडे सापडले. पोलिसांना तरुणीच्या कमरेखालचा भाग मिळाला असून तिचे बाकीचे अवयव गायब आहेत.

close