अमेरिकेत शीख प्राध्यापकावर हल्ला

September 23, 2013 1:59 PM0 commentsViews: 374

prabhjot singh23 सप्टेंबर : अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करणार्‍या एका शीख व्यक्तीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. डॉ. प्रभजोत सिंग असं या प्राध्यापकांचं नाव आहे.

 

सिंग हे शनिवारी आपल्या मित्रासोबत फिरत असताना चाळीस ते पन्नास जणांच्या गटानं त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभजोत सिंग जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा हल्ला वंशद्वेषातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

हा हल्ला करणारा गट सिंग यांना सतत ओसामा आणि अतिरेकी म्हणत हेटाळणी करत होता अशीही माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

close