सोशल मीडियाचा दुरुपयोग होऊ देऊ नका :पंतप्रधान

September 23, 2013 3:12 PM0 commentsViews: 364

pm on social media23 सप्टेंबर : महिलांविरोधात वाढलेले गुन्हे, जातीय द्वेष पसरवण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा होणारा वापर या मुद्द्यांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली. आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषद अर्थात एनआयसीच्या बैठकीचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं.

 

यावेळी त्यांनी मुझफ्फरनगर येथील दंगलीबाबत चिंता व्यक्त केली. एका छोट्या मुद्यावरून या भागात दंगल पेटली हे अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेत 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमावावा लागला. या अगोदर ही जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये हिंसाचार घडला होता. त्यापाठोपाठ बिहारमध्ये नवादा भागातही किरकोळ कारणावरुन हिंसाचार घडला होता.

 

या घटना रोखण्यासाठी पोलीस दलांने वेळोवेळी प्रयत्न केला आणि करत राहणार आहे. पण आपल्यातील काही गट स्वत:च्या फायद्यासाठी लोकांची डोकी भडकावून हिंसाचार घडवत आहे. ही लोकं आपल्या लोकशाहीसाठी मोठं आव्हान असून याच्या विरोधात कारवाई करणे गरजेच आहे असं स्पष्ट मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

 

तसंच सोशल मीडियावरुन तरूणांना अधिक माहिती मिळत आहे. यामुळे आपल्याची संबंध दृढ करण्याची संधी यामुळे मिळाली. पण या सोशल मीडियाच्या दुरूपयोग करून समाजात तणाव वाढवण्याच केलं जात आहे. अशा लोकांना आळा घालणे गरजेच आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. तर महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

 

या परिषदेला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशातले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान सोडल्यास भाजपचा इतर कोणताही मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहिलेला नाही.

close