डाऊ महाराष्ट्रात राहील- मुख्यमंत्री

February 1, 2009 9:58 AM0 commentsViews: 5

1 फेब्रुवारीडाऊ प्रकल्प राज्यातच राहणार अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. डाऊ प्रकल्पाकरिता पर्यायी जागेचा निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. डाऊ प्रकल्पाबाबत महाराष्ट्रभर विशेषत: पुण्यात वारक-यांनी मोठी आंदोलन केली. त्यानंतर या प्रकल्पाबाबत अहवाल मागवण्यात आले. तसंच विधीमंडळात या प्रकल्पाबद्दल चर्चाही झाली. त्यामळे सर्वसामान्यांचा वाढता विरोध पाहता हा प्रकल्प दुस-या ठिकाणी नेण्याचे सरकारने ठरवले आहे. तसंच पर्यायी जागेचा निर्णय घेण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर हटवणार नाही. कारण डाऊ प्रकल्प राज्याबाहेर हलवण्याच्या विशेषत: गुजराथमध्ये नेण्याच्या प्रयत्नात बरेचजण आहेत, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

close