टोल नाक्यावर सशस्त्र दरोडा,4 लाखांची रोकड लंपास

September 23, 2013 5:58 PM0 commentsViews: 394

aurangabad toll23 सप्टेंबर : औरंगाबाद-अहमदनगर हायवे वरच्या नाक्यावर सशस्त्र दरोडेखारांनी दरोडा टाकून चार लाखाची रोकड लंपास केली. लिंबेजळगाव जवळच्या नाक्यावर सकाळी पाच वाजता हा दरोडा पडला.

 

सात दरोडेखोर तोंडाला काळे कापड बांधून आले आणि त्यांनी मोठ्या आरामात कोणत्याही संघर्षा शिवाय ही लूट केली. दरोडेखोरांची लूट सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. दरोडेखोरांच्या हातात तलवारी आणि बंदुका होत्या.

 

सीसीटीव्हीमध्ये आपण कैद होवू नये म्हणून त्यांनी नाक्यावरील काही सीसीटीव्ही कॅ मेरेही फोडले. दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली गाडी पोलिसांना सापडली आहे. पण दरोडेखोर मात्र पसार झालेत.

close