खड्‌ड्यांविरोधात औरंगाबादकर उतरले रस्त्यावर

September 23, 2013 6:07 PM0 commentsViews: 245

23 सप्टेंबर : कधी पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं औरंगाबाद आता खड्डे नगरी अशी होऊ लागलीय. 2005 पासून आजपर्यंत औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झालेत. पण, हे पैसे आणि रस्ते दोन्ही खड्‌ड्यात गेलेत. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था अशीच आहे. औरंगाबादकरांना रोज रस्त्यांवरील खड्डे चुकवण्यासाठी जीवघेणी सर्कस करावी लागते. या खड्‌ड्यांविरोधात दैनिक लोकमतच्या पुढाकारने औरंगाबादकरांनी आज रस्त्यांवर उतरून आंदोलन केलं. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी…

close