अखेर कडूस गावात दारूबंदी

February 1, 2009 8:57 AM0 commentsViews: 60

1 फेब्रुवारी पुणेपुणे जिल्ह्यातल्या कडूस गावात अखेर दारुबंदी झाली. दारूबंदीच्या विरोधात महिलांनी उस्फूर्तपणे मतदान केलं. यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. त्यात गावातल्या 3 हजार 235 पैकी 2 हजार 323 महिलांनी मतदान केलं. त्यामुळे कडूस गावात अखेर दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.अशा प्रकारे मतदान करून दारूबंदी करणारं कडूस हे पुणे जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलंय.

close