महेंद्रसिंग धोणीचा नवा लूक

September 23, 2013 8:28 PM0 commentsViews: 767

23 सप्टेंबर : भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. कधी रस्त्यांवर बिनधास्त बाईक चालवणे असो अथवा महागड्या गाड्यांची खरेदी असो..आताही तो चर्चेत आलाय त्याच्या हेअर स्टाईलमुळे.

dhoni new look

चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी पहिल्या मॅचच्यावेळी मैदानात उतरला आणि सर्वांचंच लक्ष त्याच्या हेअर स्टाईलकडे गेलं. भारताचा यूथ आयकॉन असलेल्या धोणीचा हा नवा लूक पाहून सारेच अवाक झाले. धोणी मैदानात उतरला त्यावेळी त्याची हेअर स्टाईल मोठ्या स्क्रीनवर दिसली.

 

यावेळी स्टेडिअमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी शिट्‌ट्या आणि टाळ्या वाजवून धोणीच्या नव्या लूकचं स्वागत केलं. दोन्ही बाजूनं बारीक आणि मध्ये केसांचा पट्टा अशी नवी हेअर स्टाईल धोणीनं केलीये. भारताचा सर्वात लकी कॅप्टन असलेल्या धोणीच्या खेळाबरोबरच त्याची हेअर स्टाईलही नेहमी चर्चेत राहिलीये. त्याच्या हेअरस्टाईलची कॉपी देशातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर करतो. भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोणीनं केसांचं मुंडन केलं होतं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या काळात त्याच्या लांब केसांची पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशरर्फ यांनीही तारीफ केली होती.

close