ओळखपत्रासाठी ‘आधार’ नको : सुप्रीम कोर्ट

September 23, 2013 8:51 PM0 commentsViews: 1285

sc on aadhar card23 सप्टेंबर : आधारकार्ड असायला पाहिजेच अशी सक्ती आणणार्‍या केंद्र सरकारच्या घोषणेतून सुप्रीम कोर्टाने हवाच काढलीय. आधार कार्डला मुख्य ओळखपत्र म्हणून वापरण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला कोर्टाच्या निर्णयानं खीळ बसलीय.

 

गॅस कनेक्शनसाठी आधार कार्ड असण्याची सक्ती करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सरकारला सुनावलंय. आधार कार्ड हे सक्तीचं नसावं असंही कोर्टाने नमूद केलंय. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत आधार कार्ड योजना सुरू केली.

 

देशभरात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आतापर्यंत कोट्यावधी लोकांना आधार कार्डचे वाटप झाले असून खात्यात पैसे येणेही सुरू झाले आहे. मात्र आधार कार्ड योजनेमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ही योजना स्थगित करण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. आज या याचिकेवर सुनावणी झाली.

 

यावेळी कोर्टाने स्पष्टपणे आधार कार्डला ओळखपत्र म्हणून वापरण्यास सक्ती करू नका असं सांगत सरकारला फटकारलंय. तसंच बेकायदेशीर स्थलांतरांना आधार कार्डाचे वाटप करण्यात येऊ नये असंही कोर्टाने सरकारला बजावलंय.

close