‘स्वाभिमानी’चे ऊसदरवाढीवरुन पुन्हा आंदोलन?

September 23, 2013 7:56 PM0 commentsViews: 384

23 सप्टेंबर : दोन वर्षांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभरात ऊस दरवाढीसाठी मोठं आंदोलन केलं होतं. यंदाही ऊसदराचं आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करावी, नाहीतर गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी दिलाय. तसंच गेल्या वर्षीच्या हंगामातला दुसरा हप्ता प्रतिटन 200 रुपये द्यावा, अशी मागणीही त्यांनी केलीय. ऊसाचा गाळप हंगाम आता तोंडावर आलाय. त्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी पुन्हा आंदोलनाचे संकेत दिले आहे. तसंच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा तपास हा जाणीवपूर्वक केला जात नसून राज्याचे पोलीस हे असमर्थ असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केलीय. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

close