संयुक्त महाराष्ट्रासाठी कोल्हापुरात रॅलीच आयोजन

February 1, 2009 9:09 AM0 commentsViews:

1 फेब्रुवारी कोल्हापूरबेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे. या घोषणेनं कोल्हापूर शहर आणि परिसर दणाणून निघाला. निमित्त होतं, सीमा लढ्यासाठी बेळगाव इथल्या सीमावासियांनी काढलेल्या जनजागरण रॅलीचं. सीमालढ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचं बळ मिळावं या उद्देशानं बेळगांव इथल्या स्वराज्य संघटनेनं ही जनजागरण रॅली काढली.या रॅलीची सुरुवात बेळगांवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली.त्यानंतर सीमा भागातील हजारहून अधिक कार्यकर्ते मोटारसयकलीनं 110 किलोमीटरचं अंतर कापून कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी महाराष्ट्रातील जनतेनं संयुक्त महाराष्ट्रासाठी सीमावासीयांच्या पाठीमागं उभं राहावं असं कळकळीचं आवाहन केलं.

close