केनियात दहशतवाद्यांचा हैदोस सुरूच,68 ठार

September 23, 2013 10:06 PM0 commentsViews: 620

23 सप्टेंबर : केनियातल्या दहशतवादी हल्ल्याचं संकट 48 तास उलटूनही संपलेलं नाही. नैरोबीतल्या एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी अतिरेक्यांनी हल्ला करून 68 जणांचा बळी घेतलाय. यात दोन भारतीयांचाही समावेश आहे. 40 वर्षांच्या श्रीधरन नटराजन आणि 8 वर्षांच्या परमशू जैन यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. या घटनेत 200 जण जखमी झाले आहेत. तर अजूनही 10 जणांना अतिरेक्यांनी नागरिकांना ओलिस ठेवलंय.

close