बॉम्बस्फोटात आपल्या गोवण्यात आलं, बेगची नौटंकी

September 23, 2013 11:04 PM0 commentsViews: 234

Image img_236222_himayatbeagpuneblast_240x180.jpg23 सप्टेंबर : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी हिमायत बेग याने त्याला झालेल्या फाशीच्या विरोधात हायकोर्टात अपील केलंय. त्याच प्रमाणे आपल्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलंय, असं हिमायत बेग याचं म्हणणं आहे.

 

याबाबत त्यानं जेलमधून चिठ्‌ठी पाठवली आहे. त्याच प्रमाणे वरिष्ठ पत्रकार आशिष खेतान यांनी जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणात ज्या साक्षिदारांची साक्ष घेण्यात आलीय आणि ज्या साक्षीदारांची स्टिंग ऑपरेशन केलंय.

 

त्यात ते साक्षीदार त्यांच्यावर पोलिसांनी कसा दबाव आणला,याची सविस्तर माहिती त्यांनी दिलीय.या सर्व अर्ज आणि मुद्यांवर आता 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

close