वंझारांच्या ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणी अमित शाहांची होणार चौकशी

September 24, 2013 3:02 PM0 commentsViews: 157

amit shah24 सप्टेंबर : गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमित शाह पुन्हा अडचणीत सापडले आहे. माजी आयपीएस अधिकारी डी.जी. वंझारा यांनी लिहिलेल्या पत्राबाबत शाह यांची चौकशी होणार आहे.

 

वंझारा यांनी गुजरातमध्ये होणार्‍या बनावट चकमकींबद्दल राज्य सरकारलाच दोषी ठरवलं होतं. सीबीआयनं सोमवारी गुजरातचे कायदामंत्री प्रदीप सिंग जाडेजा यांची चौकशी केली होती. तर शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा आणि ऍडव्होकेट जनरल यांनाही समन्स बजावण्यात आलंय.

 
काय होते वंझारांचे आरोप?

 

 • - गुजरात व्यतिरिक्त इतर कुठल्याही राज्यात इतक्या मोठ्या संख्येनं पोलीस अधिकार्‍यांना इतक्या प्रदीर्घ काळासाठी तुरुंगात ठेवण्यात आलेलं नाही.
 • - जेव्हा जेव्हा या सरकारवर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा मी आणि माझे अधिकारी या सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो.
 • - हे सरकार आम्हाला वाचवू इच्छित नाही. इतकंच नाही, तर स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मला आणि माझ्या अधिकार्‍यांना तुरुंगातच कसं ठेवता येईल, यासाठी हे सरकार सर्व प्रयत्न करतंय
 • - जेव्हा अमित शहाला अटक झाली, तेव्हाच हे सरकार जागं झालं आणि (त्याला वाचवण्यासाठी) प्रामाणिकपणे प्रयत्न करू लागलं.
 • - या सरकारनं आम्हाला दगा दिला, आम्हाला वार्‍यावर सोडलं
 • - अमित शहा पूर्णपणे आत्मकेंद्री आहे आणि हे त्याने स्वतःच सिद्ध केलंय
 • - 2002 ते 2007 या काळात अधिकार्‍यांनी सरकारच्या धोरणानुसारच कारवाई केली
 • - जेव्हा गुजरात जिहादी दहशतवादाच्या आगीत होरपळत होतं, तेव्हा मला गांधीनगरमधल्या मोठ्या असामींचे रोज डझनभर फोन यायचे.
 • - आमची गरज संपली आणि आम्हाला अटक झाली. त्यानंतर कुणालीही आमची काळजी नव्हती. आम्ही कसे आहोत, याची साधी विचारपूसही कुणी केली नाही.
 • - या अनैतिक सरकारनं गांधीनगरमध्ये राहण्याचा हक्क गमावलाय.
 • - या सरकारची जागा तळोजा सेंट्रल जेल किंवा साबरमती सेंट्रल जेलमध्येच आहे.
 • - दिल्लीकडे कूच करण्याची घाई असलेल्यांना (मोदींना) तुरुंगात असलेल्या पोलीस अधिकार्‍यांचं कर्ज फेडण्याचा विसर पडलाय.
 • - ज्या नरेंद्र मोदींना मी देवाप्रमाणे मानायचो, त्यांच्यावर असलेल्या परमोच्च श्रद्धेमुळे आणि आदरामुळे मी इतक्या प्रदीर्घ काळ मौन बाळगलं.
 • - पण, त्यांच्या डोळ्यांवर पडदा टाकणार्‍या अमित शहा यांच्या दुष्ट प्रभावामुळे माझा देव माझ्यामागे उभा राहू शकला नाही.
close