राहुल गांधी विदर्भ दौर्‍यावर

September 24, 2013 2:31 PM0 commentsViews: 97

Image rahul_gandhi_in_satara_2_300x255.jpg24 सप्टेंबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून महाराष्ट्र दौर्‍यावर असून आज ते नागपुरात आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहे.

 

या बैठकीला अडीच हजारावर पदाधिकारी उपस्थित आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे.

 

दरम्यान, वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन चालविणार्‍या विदर्भ ऍक्शन कमिटीच्या 10 कार्यकर्त्यांना या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलंय. राहुल गांधी दुपारी नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.

close