180 जागा मिळवणारा पक्षच सत्तेवर,पवारांचे भाकीत

September 24, 2013 4:16 PM0 commentsViews: 992

sharad pawar on aghadi24 सप्टेंबर : आगामी लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाला 180 जागा मिळतील, त्यालाच सत्ता स्थापन करता येईल असं भाकीत केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.

 

तसंच कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करताना प्रादेशिक पक्षांचाच आधार घ्यावा लागणार आहे, असा दावाही पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केलाय. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा भाजपला फारसा फायदा होणार नाही, असंही पवारांनी म्हटलंय.

 

तसंच यूपीएला पुन्हा सत्तेत येण्यासाठी वातावरण पोषक आहे. प्रत्यक्ष जी परिस्थिती मांडली जातेय. त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे, त्यामुळे यूपीएला सत्तेत जाण्यासाठी फारशी अडचण येणार नाही, असंही पवार म्हणाले.

पवार म्हणतात…
“आगामी निवडणुकीत ज्या पक्षाला 180 जागा मिळतील, त्यालाच केंद्रात सत्ता स्थापन करता येईल. यापुढचं केंद्रातलं सरकार हे प्रादेशिक पक्षांच्याच जोरावर स्थापन होईल. तृणमूल काँग्रेस,अण्णा द्रमुक, द्रमुक, नवीन पटनायक आणि नितीश कुमार यांच्या पक्षांचा सत्ता स्थापनेसाठी आघाडीचे घटक म्हणून विचार करावाच लागेल. त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही.”
 

close