बाळासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग सुकर

September 24, 2013 5:11 PM0 commentsViews: 104

24 सप्टेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी पहिल्या स्मृर्ती दिनापुर्वी, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक उभारण्याची कसरत शिवसेनेला करावी लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेला हेरीटेज आणि सीआरझेड यांच्या नियमांत बसेल असं स्मृर्ती स्मारक उभारावं लागणार आहे. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास हेरीटेज विभागाने परवानगी दिलीये. पण सीआरझेड दोन या नियमांत स्मृर्ती स्मारक उद्यानाची जागा येत असल्यामुळे, याठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नाहीये. त्यामुळे स्मृर्ती उद्यानासाठी फक्त मातीचाच वापर करावा लागणार आहे. शिवसेनेच्या स्मारक प्रस्तावात स्मृर्ती उद्याना भोवती कुंपण, मार्गीका, लॅम्पपोस्ट, जमिनीखाली पाण्याची टाकी, इलेक्ट्रीक बाँक्सचा समावेश होता. पण शिवाजी पार्कवर फक्त 15 टक्केच बांधकामाची परवानगी आहे. पण हा बांधकाम FSI याआधीच संपला असल्यामुळे अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी एफएसआय शिल्लक नाहीये. आता शिवसेनेसमोर आव्हान आहे ते बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृर्ती दिना आधी शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याचं.

close