शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली

September 24, 2013 5:42 PM0 commentsViews: 925

shiv sena dasra melava24 सप्टेंबर : दरवर्षी दसर्‍याला शिवाजी पार्कवर होणार्‍या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला महापालिकेनं परवानगी नाकारलीय. त्यामुळे आता ही परवानगी मिळवण्यासाठी शिवसेना हायकोर्टात जाणार आहे.

 

शिवसेनेचे सचिव दिवाकर बोरकर यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे ही परवानगी मागितली होती. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबतची परवानगी हायकोर्टाकडूनच घ्यावी असं उत्तर महापालिकेने शिवसेनेला दिलंय.

 

गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देताना हायकोर्टाने यापुढे हे प्रकरण महापालिकेच्या स्तरावरच सोडवावं असे निर्देश दिले होते असं असतानाही यावेळी पुन्हा हे प्रकरण हायकोर्टात जाणार आहे.

close