नवर्‍याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

September 24, 2013 6:39 PM0 commentsViews: 1069

24 सप्टेंबर : हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून नवर्‍याकडून होणार्‍या छळाला कंटाळून प्रियंका शिरवाळे या उच्चशिक्षित महिलेनं आत्महत्या केलीये. पुण्यातील पिंपळे सौदागर परिसरात ही घटना घडली. प्रियंकाचं सौरव शिरवाळे याच्याशी लग्न झालं. लग्नानंतर या दाम्पत्याला मुलगी झाली. पण सौरव याला मुलगा हवा होता. मुलगी झाली म्हणून सौरव आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रियंकाचा छळ सुरु केला.आपल्या माहेरहून तीन लाख रूपये रोख, एक सोन्याची अंगठी आणि कार आणावी अशी मागणी तिचा पती सौरव शिरवळे तिच्याकडे वारंवार करत होता. शेवटी नवर्‍याच्या या छळाला कंटाळून प्रिंयकाने गळफास लावून आत्महत्या केलीये. प्रिंयकाच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती आणि तिच्या सासूला अटक केली आहे.

close