उत्तर भारताला भूकंपाचा हादरा

September 24, 2013 8:24 PM0 commentsViews: 434

delhi aurth24 सप्टेंबर : उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाने हादरालाय. दिल्ली आणि राजस्थानला आज भूकंपाचे धक्के बसलेत. भूकंपाचं केंद्र बलुचिस्तानमधल्या दलबंदीनमध्ये आहे.

 

रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी मोजण्यात आलीय. सिंध आणि कराचीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची बातमी पाकिस्तानी मीडियानी दिलीय. उत्तर भारतालाही भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत.

 

पण भुकंपात कोणतंही नुकसान झाल्याची माहिती नाही. या अगोदरही उत्तर भारताला भूकंपाचे हादरे बसले होते यावेळीही बलुचिस्तान केंद्रबिंदू होतं.

close