राहुल गांधींनी नेत्यांना खडसावलं

September 24, 2013 8:38 PM0 commentsViews: 557

RAHUL IN GUPTKASHI_124 सप्टेंबर : 2014 च्या निवडणुकीसाठी तयार राहा, मतभेद विसरुन कामाला लागा. सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं आहे. सरकारी योजनांची माहिती जनतेला द्या. यापुढे कार्यकर्त्यांना थेट दिल्लीशी बोलता येईल असा थेट संवाद काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांशी साधला.

 

राहुल यांनी आज नागपुरात काँग्रेस पदाधिकार्‍यांशी थेट संवाद साधला आणि त्यांचं गार्‍हानं एकून घेतलं. या बैठकीचं विशेष म्हणजे या बैठकीत कुठलाच नेता किंवा मंत्री नसल्यानं राहुल गांधींनी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि कार्यकर्तांनी मंत्र्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. सामन्य कार्यकर्त्यांना कोणीच विचारत नाही किंवा त्यांची दखल घेत नाही ही सर्व कार्यकर्त्यांची मुख्य तक्रार होती.

 

तळागाळात काम करताना कार्यकर्त्यांना सरकारकडून बळ मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर या सर्व तक्रारी मंत्र्यांच्या कानावर घालण्याच्या आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना वेळ द्यावा असं सांगणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. पक्षाचा सर्वोच्च नेता थेट पहिल्यांदाच आपल्याशी बोलत असल्यानं कार्यकर्त्यांमध्येही त्याबद्दल विशेष आकर्षण जाणवलं.

 
राहुल गांधी म्हणतात…
“2014 च्या निवडणुकीसाठी तयार राहा, मतभेद विसरुन कामाला लागा. सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं आहे. सरकारी योजनांची माहिती जनतेला द्या. यापुढे कार्यकर्त्यांना थेट दिल्लीशी बोलता येईल. महिलांना भेडसावणार्‍या सर्व प्रश्नांची दखल घेतली जाईल. सरकार आणि पक्षामधली दरी कमी झाली पाहिजे.
संजय देवतळेंना राहुल गांधींची ताकीद

दरम्यान, गडचिरोलीचे संपर्क मंत्री संजय देवतळे यांच्या विरोधात काँग्रेसचे अहेरीचे तालुका अध्यक्ष महेबूब अली यांनी थेट राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केलीय. देवतळेंना 200 पत्र लिहूनही त्यातल्या कुठल्याही पत्राची दखल त्यांनी घेतली नसल्याची ही तक्रार आहे. शिवाय देवतळे नक्षलग्रस्त भागांचा कधी दौराही करत नाहीत अशी ही त्यांची तक्रार आहे. राहुल गांधींनी या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतलीय. या तक्रारीबाबत देवतळेंचं स्पष्टीकरण राहुल गांधींनी एकून घेतलं नाही. यावेळी राहुल गांधींनी देवतळेंना ताकीद दिली.

close