मारकुट्या नगरसेवकांमुळे उद्धव संतापले,जनतेची माफी मागण्याचे दिले आदेश

September 24, 2013 8:53 PM1 commentViews: 1029

udhav thakrey24 सप्टेंबर : कल्याण-डोंबिवलीच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी जनतेची माफी मागावी, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसंच मल्लेश शेट्टी यांच्या स्थायी समिती सदस्य पदाचा आणि रविंद्र पाटील यांच्या सभागृह नेते पदाचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतलाय. या दोघांचं नगरसेवकपद मात्र कायम ठेवण्यात आलंय.

 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महासभेत पाणी प्रश्नावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी सभागृह नेते रविंद्र पाटील ही चर्चा गांभिर्यानं घेत नाहीत, असा आरोप शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांनी केला. त्यानंतर रविंद्र पाटील आणि शेट्टी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.

 

दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती. त्यामुळे आमदार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार सर्वच्या सर्व 32 नगरसेवकांचे राजिनामे घेतले होते. आज या प्रकरणी शिवसेना भवनात सर्व नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात उद्धव ठाकरेंनी सगळ्या नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतली.

  • Vijay Hande

    उद्धवजी अभिनंदन ! ! !

close