आर्ट कॉलेजच्या परीक्षांचा घोळ कायम

February 1, 2009 6:42 AM0 commentsViews: 6

1 फेब्रुवारी मुंबईअलका धुपकर राज्यातल्या आर्ट कॉलेजच्या डिप्लोमाच्या परीक्षांचा घोळ वाढला आहे. या परीक्षा कला संचालनालय घेणार की एमएसबीटीने ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. डिप्लोमाच्या परीक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. त्यामुळे आता पर्यंत पेपर सेटिंग होणं गरजेचं होतं. पण पेपर सेट करणं तर सोडाच अभ्यासक्रम कुठला शिकवायचा हाच सगळ्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना प्रश्न पडलाय. फाउंडेशन आर्ट आणि आर्ट टीचर डिप्लोमाला शिकणा-या या मुलांचा अभ्यासक्रम यंदापासूनच तंत्रशिक्षण मंडळ म्हणजेच एमएसबीटीकडे देण्यात आला होता. पण नागपूर अधिवेशनात अचानक चक्र फिरली. कॉलेजेस सुरू होऊन सात महिने उलटल्यानंतर मंत्रीमहोदयांनी पुन्हा अभ्यासक्रम बदलला. याबाबत रहेजा आर्ट कॉलेजचे प्रा. शिरीष मिठबावकर सांगतात, या निर्णयामुळे आर्टच्या विद्यार्थ्यांच्या एका अख्ख्या पिढीचा सत्यानाश होणार आहे.आपण विद्यार्थ्यांना पुन्हा दोन वर्ष मागे नेऊन ठेवणार आहोत.डिप्लोमाचा 30 वर्ष जुना असलेला अभ्यासक्रम बदलण्यासाठी एमएसबीटीने 35 लाख रुपये खर्च केले होते. कला क्षेत्रातल्या बदलांचा अभ्यास करून नवीन अभ्यासक्रम तयार केला होता. पण आता नवीन अभ्यासक्रम तयार करणा-यांना अंधारात ठेऊनच पुन्हा जुन्या अभ्यासक्रम स्वीकारायचं ठरलं गेलं.

close