पैनगंगेच्या किनार्‍यावर 40 खेड्यांमध्ये ‘फ्लोरोसिस’चा विळखा

September 24, 2013 9:50 PM0 commentsViews: 1133

24 सप्टेंबर : पिण्यासाठी, पाण्याची साठवणूक न करता, भूगर्भातून पिण्याच्या पाण्याचा उपसा केला जातोय. खोल भूगर्भातल्या पाण्याचा उपसा आरोग्यासाठीच धोकादायक ठरतोय. भारतामध्ये साडेसहा कोटी नागरिकांना विविध प्रकारच्या फ्लोरोसिसनं ग्रासलंय. तर, महाराष्ट्रात, पैनगंगेच्या किनार्‍यावरच्या सुमारे 40 खेड्यांमध्ये असाध्य फ्लोरोसिस आजारानं विळखा घातलाय.

 
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, पिण्याच्या एक लीटर पाण्यामध्ये 1.5 मिलीग्रॅमपेक्षा जास्त फ्लोराईड असेल, तर ते पाणी आरोग्याला धोकादायक असतं. महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांत मात्र, हे प्रमाण 6 पासून 9 मिलिग्रॅम इतकं धोकादायक पातळीवर पोचलंय.

 
1930 साली आंध्रप्रदेश इथल्या नलगोंडा गावात फ्लोरोसिसची समस्या देशपातळीवर पहिल्यांदा लक्षात आली. 1937 बद्दल अहवाल प्रसिद्ध झाले. चक्रपाणी आनंदा यांच्या गाजलेल्या ‘क्रिपल्ड लाईव्हज’ डॉक्युमेंटरीमधली ही दृश्य..’फ्लोरोसिसमुक्तीच्या दिशेने’ जाण्यासाठी याच नलगोंडा गावात शोधलेलं नलगोंडा तंत्र आता जगभरात प्रमाणित पद्धत म्हणून वापरलं जातंय. महाराष्ट्रातच्या 6 जिल्ह्यांचा नलगोंडा होण्याची वाट सरकार पाहतंय का ? हा आमचा प्रश्न आहे.

 
फ्लोरोसिस मुक्तीसाठीच्या मागण्या
– फ्लोराईडयुक्त पाण्याऐवजी पर्यायी पाणीपुरवठा करावा
– फ्लोरोसिसच्या पेशंट्सना कॅल्शियमच्या गोळ्या पुरवणं
– फ्लोरोसिसग्रस्त गावांमध्ये नियमित वैद्यकीय कॅम्प घेणं
– फ्लोरोसिस नियंत्रणाच्या केंद्रीय कार्यक्रमाचा निधी वाढवावा
महाराष्ट्रातली गावच्या गावं एका असाध्य आजाराच्या विळख्यात सापडतं चाललीय. पण, सिंचन घोटाळ्यावरुन राजकारण करणार्‍या सत्ताधारी आणि विरोधकांना या गावकर्‍यांना पिण्याचं शुद्ध पाणी पुरवण्याची इच्छाशक्ती दाखवता येत नाहीये. महाराष्ट्राचं नलगोंडा होण्याआधी हे थांबवावं लागेल.

close