जगनमोहन रेड्डी 15 महिन्यांनतर तुरुंगातून बाहेर

September 24, 2013 10:01 PM0 commentsViews: 333

jagmohan reddy24 सप्टेंबर : वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी तब्बल 15 महिन्यांनतर तुरुंगातून बाहेर आलेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जगन मोहन रेड्डी यांना 15 महिन्यांनंतर जामीन मिळालाय.

 

2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि हैदराबाद सोडून न जाण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. संयुक्त आंध्र प्रदेशासाठीचं आंदोलन शिगेला पोचलं असताना रेड्डी यांना जामीन मिळालाय. दरम्यान, या जामिनासाठी काँग्रेसबरोबर कुठलचं ‘डील’ झालेलं नाही, असं जगन मोहन यांच्या बहिणीनं सांगितलंय.

close