नदालने बाजी मारली

February 1, 2009 2:52 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारी नदालकडून फेडरर पुन्हा एकदा पराभूत झाला आहे. वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या राफेल नदालनं पाच सेट चाललेल्या मॅचमध्ये रॉजर फेडररचा पराभव करत त्याच्या आयुष्यातलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकलं. फेडरर त्याचं 14 ग्रँड स्लॅम जिंकून पीट सॅम्प्रसच्या रेकॉर्डची बरोबरी करेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण वर्ल्ड नंबर वनला हरवणं तितकं सोपं नव्हतं. 22 वर्षाच्या टॉप सीडनं पहिला सेट टाय ब्रेकमध्ये जिंकला. मग फेडररनं दुसरा सेट 6-3 असा जिंकला. टेनिसमधले दोन सर्वोत्तम खेळाडूंनी मॅच पाचव्या सेटमध्ये नेली. नदालनं फेडररची सर्व्हिस भेदत शेवटच्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली आणि ती कायम ठेवत मॅच 7-5, 3-6, 7-6, 3-6, 6-2 अशी जिंकली. पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन आणि एकूण 6वं ग्रँडस्लॅम नदालनं जिंकलं. या आधी त्याच्या खात्यात तीन फ्रेंच ओपन आणि एक विम्बल्डन आहे.

close