‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’चा सेट जळून खाक

September 25, 2013 1:40 PM0 commentsViews: 2857

comedy nights with kapil set25 सप्टेंबर : कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘कॉमेडी विथ कपिल’च्या सेटला आज सकाळी 8 वाजेच्या सुमार ही आग लागली होती. या आगीत सेट जळून भस्म झाला.

 

मुंबई येथील गोरेगाव फिल्मिसिटीमध्ये कॉमेडी विथ कपील या कार्यक्रमाच्या सेट लावण्यात आला होता. आज सकाळी सेटच्या मागे स्फोटाचा आवाज झाली आणि काही क्षणात आग पसरली. या सेटमध्ये लाकडाचा जास्त वापर केल्यामुळे आग आणखी पसरली. आता ही आग आटोक्यात आलीये.

 

मात्र आगीमध्ये हा सेट पुर्णपणे भस्मसात झालाय. या आगीत सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही. आगीचं कारण समजू शकलं नाही. चार फायर ब्रिगेड च्या बंबानी दोन तासात आग आटोक्यात आणलीय.

close