‘ति’च्याशी बोलला म्हणून मित्रांनी केला मित्राचा खून

September 25, 2013 1:07 PM0 commentsViews: 3110

nalasopara25 सप्टेंबर : आपल्याला आवडणार्‍या मुलीशी बोलला म्हणूण चौथ्या वर्गात शिकणार्‍या चार विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्ग मित्राचा दगडानं ठेचून खून केल्याची धक्कादायक घडना नालासोपार्‍यात घडलीय. हे सर्व विद्यार्थी 13 ते 14 वर्ष वयोगटातले आहेत. विरेंद्र मौर्य असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो तेरा वर्षांचा आहे.

 

हे सर्व विद्यार्थी नवजीवन विद्यामंदिर या शाळेत शिकतात. पाच दिवसांपूर्वी 20 सप्टेंबर रोजी विरेंद्रचा मृतदेह नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळ सापडला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासानंतर हा खून त्याच्याच वर्गमित्रांनी केल्याचं उघड झालं.

 

या प्रकरणी चंदन गुप्ता, आशिष कनोजिया, सुरज जाधव, आकाश देशमुख यांना ताब्यात घेतलंय. विरेंद्रची एका मुलीशी मैत्री होती. त्या मुलीशी बोलू नको असं या चौघानी बजावलं होतं. या भांडणातून या चौघानी विरेंद्रचा दगडानं ठेचून खून केला.

close