हजारो मासे मृत

September 25, 2013 5:14 PM0 commentsViews: 148

25 सप्टेंबर : गणेश मूर्ती विसर्जन आणि मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेलं निर्माल्य यामुळे नागपूरच्या गांधीसागर तलावाचं पाणी प्रदुषित झालंय. त्यामुळेच तलावातल्या हजारो माशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जातींचे मोठमोठे मासे ह्या प्रदुर्षणाचे शिकार झाले आहेत. गणपतीच्या केमिकलयुक्त रंगांमुळे ह्या माशांचा जीव गेलाय. किमान तीन टन मृत मासे आता पर्यंत काढले गेलेत. माशांना काढण्याचा उपक्रम अजून तीन दिवस चालू राहणार आहे. या जलप्रदुर्षणामुळे ठेकेदाराचे देखील लाखोंचे नुकसान झालंय. हे मेलेले मासेच बाजारात विकले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

close