हर्षवर्धन जाधवांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’, शिवसेनेत करणार प्रवेश

September 25, 2013 5:37 PM0 commentsViews: 2677

Image img_227482_mnsledarharshvardhanjadhav_240x180.jpg25 सप्टेंबर : मनसेचे कन्नडचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात जाधव सेनेत जाहीर प्रवेश करणार आहे. आज जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जाधव यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

 

पक्षातील अंतर्गत कारभार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून हर्षवर्धन जाधव नाराज होते. पक्षात पैसे घेऊन काम केलं जात, राज यांच्याकडे नेतृत्त्व गूण नाही असा आरोप जाधव यांनी केला होता. त्यांनी थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरच नाराजीच खापर फोडलं होतं. राज ठाकरेंशी वाद इतका विकोपाला गेली होती की राज यांनी जाधव यांचा फोन तर दूरच त्यांना दारावरही उभं केलं नाही.

 

त्यामुळे जाधव मनसेतून बाहेर पडणार हे निश्चित होत पण कोणत्या पक्षात जाणार यावर राजकीय चर्चा सुरू होती. सुरुवातीला जाधव अगोदर राष्ट्रवादीच्या वाटेवर निघाले. मात्र राष्ट्रवादीने काही प्रतिसाद न दिल्यामुळे अखेरीस जाधव यांनी सेनेची वाट धरली. मराठवाड्यातून हर्षवर्धन जाधव हे मनसेचे एकमेव आमदार आहे. एकंदरीतच निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झालीय आणि आता जाधव यांच्या निमित्ताने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात झालीय. जाधव यांच्या जाण्यामुळे मनसेला किती धक्का पोहचतो हे येणार्‍या निवडणुकीतून स्पष्ट होईल.

close