..तर राष्ट्रवादीचीही गरज नाही-राहुल गांधी

September 25, 2013 7:28 PM0 commentsViews: 2583

Image img_234862_rahulgandhiincii_240x180.jpg25 सप्टेंबर : काँग्रेस पक्षाची ताकद एवढी वाढवा की, पक्षाच्या जागा 272 होतील. बहुमत मिळाल्यानं आपल्याला राष्ट्रवादीच काय तर इतर कोणत्याही पक्षाची मदत घ्यावी लागणार नाही असा आदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

 

राहुल गांधी आज पुण्यात होते. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,खानदेश आणि कोकण या विभागातल्या 22 जिल्ह्यांमधल्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. आज दिवसभर सगळ्या कार्यकर्त्यांची गार्‍हाणी, सूचना राहुल गांधीनी ऐकून घेतल्या.

 

यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना पक्ष संघटन मजबूत करण्याकरता कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं पाहिजे असंही राहुल म्हणाले. बेशिस्त आणि पक्षविरोधी काम करणारे काही नेते संघटनेत पुढे चाललेत आणि खरा कार्यकर्ता मागे पडतोय याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

 

राहुल गांधी म्हणतात…
‘काँग्रेस पक्षाची ताकद एवढी वाढवा की, पक्षाच्या जागा 272 होतील. बहुमत मिळाल्यानं आपल्याला राष्ट्रवादीच काय इतर कोणत्याही पक्षाची मदत घ्यावी लागणार नाही. गरिबांसाठी काँग्रेसनं जे निर्णय घेतलेत, त्याचा फायदा निवडणुकीत पक्षाला निश्चित होईल. 2004 आणि 2009 च्या तुलनेत पक्षाचं संख्याबळ वाढून, काँग्रेसची सत्ता येईल. बेशिस्तपणे वागणारे आणि पक्षविरोधी काम करणारे पक्षातले काही लोकच पुढे जात आहेत. आणि खरा कार्यकर्ता मागे पडतोय, याबद्दल मला खंत वाटते.’

close