मराठा समाजाला हवं स्वतंत्र आरक्षण

February 1, 2009 3:35 PM0 commentsViews: 3

1 फेब्रुवारी मुंबईमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीनं शिवाजी पार्क इथे मेळावा भरवला आहे. विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा समन्वय समितीचे कार्यकर्ते आले आहेत. मेळाव्यात 13 मराठा संघटना सामील झाल्या आहेत. मराठा समाजाला 25 टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावं. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम त्वरित सुरू करावं. या दोन प्रमुख मागण्या या महामेळाव्यात समितीतर्फे करण्यात आल्या आहेत. आरक्षणासंदर्भात मराठा समन्वय समितीतर्फे महाराष्ट्रभरात जनजागृती अभियान राबवण्यात आलं होतं. त्या अभियानाची सांगता या मेळाव्यात झाली.

close