MCAची निवडणूक लढवणार -मुंडे

September 25, 2013 10:12 PM0 commentsViews: 976

21 सप्टेंबर: मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्यासाठी आपण उत्सुक आहोत पण कोणत्या पदासाठी ते आत्ताच सांगणार नाही, अशी घोषणा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर गोपीनाथ मुंडेही एमसीए निवडणुकीच्या रिंगणात आहे. गोपीनाथ मुंडेंनी स्टायलो क्रिकेट क्लबचं सदस्यत्व स्विकारलंय. 17 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक रंगणार आहे.
MCAच्या आखाड्यात राजकारणी

– पारसी पायोनिअर क्रिकेट क्लब – शरद पवार (राष्ट्रवादी)
– माझगाव क्रिकेट क्लब – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
– मेरी क्रिकेट क्लब – उद्धव ठाकरे (शिवसेना)
– स्टायलो क्रिकेट क्लब – गोपीनाथ मुंडे (भाजप)
– इलेव्हन 77 स्पोर्ट्स क्लब – नारायण राणे (काँग्रेस)
– यंग फ्रेंड्स क्रिकेट क्लब – आदित्य ठाकरे (युवा सेना)
– दादर पारसी झोराष्ट्रीयन क्लब – नितीन सरदेसाई (मनसे)
– प्रबोधन गोरेगाव क्लब – सुभाष देसाई (शिवसेना)
– न्यू हिंदू क्रिकेट क्लब – मिलिंद नार्वेकर (शिवसेना)
– मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
– एम.बी. युनियन क्रिकेट क्लब – सचिन अहिर (राष्ट्रवादी)
– दादर स्पोर्ट्स क्लब – राहुल शेवाळे (शिवसेना)
– राजस्थान क्रिकेट क्लब – आशिष शेलार (भाजप)

close