दिल्लीत विमानाच इमर्जन्सी लॅन्डिग

February 1, 2009 1:36 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारी दिल्ली दिल्ली विमानतळावर एका विमानाच इमर्जन्सी लॅन्डिग करण्यात आलं आहे. दिल्ली-गोवा इंडिगो इ-664 हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. त्यानंतर या विमानाला दिल्ली विमानतळावर एका बाजूला नेण्यात आलं. एनएसजी आणि दिल्ली पोलिसांनी तात्काळ विमानाचा ताबा घेतला. दरम्यान विमानतळ परिसरात हाय ऍलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या विमानाचं अपहरण झाल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. पण विमानाचं अपहरण झालं नसल्याचं सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. विमानातल्या एका प्रवाशानं संशयास्पद वागल्याचं पायलटनं सांगितल्यानंतर विमान उतवण्यात आलं. दरम्यान, विमानातले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं इंडिगो एअरलाईन्सनं स्पष्ट केलं आहे.

close