संजूबाबाचा कार्यक्रम लांबणीवर

September 26, 2013 7:57 PM0 commentsViews: 606

26 सप्टेंबर : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याचा सहभाग असलेला कैद्यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आज हा कार्यक्रम होणार होता. पण सुरक्षेच्या कारणावरून हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती कळतेय. येरवडा जेलचे एसपी योगेश देसाई यांनी ही माहिती दिलीये. या कार्यक्रमाची जी तिकीटं विकली गेली आहेत, त्या सगळ्यांचे पैसे परत देणार असल्याची माहिती मीरा बोरवणकर यांनी दिलीये.

close