निवडणुकांच्या तोंडावर बिहारला विशेष दर्जा बहाल

September 26, 2013 6:18 PM0 commentsViews: 526

bhir special state26 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारला विशेष राज्याच्या दर्जाचं गाजर केंद्र सरकारनं दाखवलंय. सरकारी समितीने बिहार आणि ओरिसाला अतिमागास राज्यांच्या यादीत स्थान दिलंय.

 

रघुराम राजन यांच्या समितीनं हा अहवाल तयार केलाय. त्यात बिहार, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशसह इतर सात राज्यांना अविकसित राज्यांच्या यादीत स्थान देण्यात आलंय. या अहवालाचं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वागत केलंय. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता आता राजकीय समीकरणं बदलण्याची मोठी शक्यता आहे.

 

कारण नितीश कुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडल्यनंतर आयबीएन नेटवर्कच्या थिंक इंडिया या कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की, बिहारला जो कोणता पक्ष विशेष राज्याचा दर्जा देईल, त्याला पाठिंबा देण्याबाबत आम्ही विचार करु. त्यामुळे आता राजकीय पटलावरची समीकरणं वेगानं बदलताना आपल्याला दिसणार आहेत. या अविकसित राज्यांमध्ये दरडोई उत्पन्न घटल्यामुळेच त्यांच्यावर मागासलेपणाचा शिक्का बसल्याचं रघुराम राजन यांच्या कमिटीनं म्हटलं होतं.

close